महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा प्राण्यांची एन्ट्री झालीय...वेगवेगळ्या प्राण्यांचे दाखले देत दोन्ही शिवसेना एकमेकांवर तुटून पडल्यात...कोण एकाला बकऱ्याची उपमा देतोय...तर दुसरा गाढवाला वादात ओढतोय...पाहुयात राजकारणात नेमकं काय घडतंय, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट...
बकरा, उंदीर आणि गाढव. हे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आज चर्चेत राहिलेले चेहरे. तुम्ही म्हणाल की या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा राजकारणाशी काय संबंध? पण आपल्याकडे बोलघेवडे नेते मुक्या प्राण्यांनाही कसे राजकारणात ओढतात हे आज दिसून आलं. राजकारणाच्या मैदानात पहिली एन्ट्री झाली बकऱ्याची. खाटिक, लाकूड आणि सुरी अशी नेपथ्यरचना करत संजय राऊतांनी या बकऱ्याला मैदानात आणलं. या बकऱ्यात राऊतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रुप दिसलं तर त्याच्या मानेवर सुरी ठेवणारा खाटिक दिल्लीत बसल्याचाही साक्षात्कार झाला.